सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
उरण तालुका अंतर्गत विंधणे ग्रामपंचायत हद्दीत मौजे बोरखार धाकटी जुई नवापाडा टाकीगाव,विंधणे कातकरी वाडी विंधणे खालचा पाडा या गावात अंतर्गत रस्ते काँक्रिटिकरण करणे पेव्हर ब्लॉक बसवणे अंतर्गत गटारे बनवणे पावसाळ्यापूर्वी ची नालेसफाई मौजे बोरखार धाकटी जुई साठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाईपलाईन ची कामे सुरू आहेत तसेच धाकटी जुई प्राथमिक शाळा, धाकटी जुई अंगणवाडी नवीन इमारत बांधकाम सुरू आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


त्यामुळे सरपंच सौ निसर्गा रोशन डाकी व ग्रामपंचायत सदस्य याचं अभिनंदन चा वर्षाव होत आहे भविष्यात ही अनेक विकास कामांसाठी रायगड जिल्हा परिषद, mmrda, जलसंधारण योजना , तसेच उरण तालुक्यातील कंपनीच्या CSR फँडातून कामांसाठी पाठपुरावा केल्याचे सरपंच सौ . निसर्गा रोशन डाकी यांनी बोलताना सांगितले








Be First to Comment