पेणच्या न्यु व्हिजन महाविद्यालयाचे विद्यार्थी भविष्यात उच्च अधिकारी होतील —- मंगेश नेने
सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
कोविड काळात राज्यातील शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे मात्र येणाऱ्या काळात सामाजिकदृष्ट्या आपल्या मनाशी खूणगाठ बांधून या महाविद्यालयातून पेण तालुक्यातील विद्यार्थी उच्च अधिकारी होतील असे प्रतिपादन अॅड. मंगेश नेने यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन अॅड.मंगेश नेने, न्यु व्हिजन महाविद्यालयाचे अध्यक्ष राजु पिचिका यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलतांना नेने म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरीता पेण मध्ये अधिक सोईस्कर शिक्षण मिळविण्यासाठी न्युज व्हिजन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली असून येथील विद्यार्थी आपले भवितव्य घडवितांना संस्थेसह आई-वडिलांचेही नांव उज्वल करणार आहेत.तर या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी ही संस्था खंबीरपणे उभी राहणार असून त्यास सवलत सुध्दा देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राजु पिचिका यांनी सांगितले.
यावेळी संचालक प्रविण कदम, शशिकांत दिघे, सुजित काठे, मिलिंद कांबळे, संचालिका प्रतिक्षा कदम, निता रामधरणे, गौरव रामधरणे प्रणाली कांबळे आदी उपस्थित होते.








Be First to Comment