सिटी बेल । उरण । रोहित पाटिल ।
निसर्गशी जुळले माझे नाते , मज वाटे पसरावी हिरवळ चोहीकडे , निखळ आनंद वाटे तेव्हा माझ्या मना निसर्गमाझा गुरू निसर्ग माझा मित्र निसर्गाच्या सानिध्यात कुशीत जो रमला त्याला जणू परमानंद मिळाला. आजच्या काळातील गंभीर समस्या म्हणजे तापमान वाढ आणि तापमानावाढ सोबत या वसुंधरेवर आलेलं संकट जर हे संकट दूर करायच असेल तर प्रत्येकाने या निसर्गाशी नात जोडला पाहिजे.
अश्या प्रकारे आवरे गावातील प्रतिष्ठित नागरीक शिवकुमार म्हात्रे यांचा सुपुत्र ओम म्हात्रे यानें वडिलांकडे एकच मागण मागितलं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने निसर्गरक्षण करण्यासाठी आपण वृक्षारोपण करावे. खरच सारडे विकास मंच ने राबविलेलं उपक्रम म्हणजे च एक कुटुंब एक झाड ही संकल्पना आणि ओंम यांनी त्या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद देत वृक्षारोपण करण्यासाठी सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या कडे झाडे सुपूर्द केली.
या अगोदर ओंम म्हात्रे याने सुयश क्लासेस आवरे च्या शैक्षणिक कार्यक्रमात किंवा निगा फौंउडेशन आवरे च्या कार्यक्रमात सुद्धा आपलं अतिशय सुरेख आणि सुंदर योगदान दिले आहे.








Be First to Comment