Press "Enter" to skip to content

सामाजिक कार्यकर्ता असावा तर प्रशांत पाटील यांच्या सारखा !

अनेकांनी केले अभिनंदन !!

सिटी बेल । उरण । अजित पाटील ।

सध्याच्या कोविडच्या साथीच्या आजारात अगदी भल्या माणसाची ही बुद्धी भ्रष्ट होऊन रस्त्यावर मिळणारी कोणतीही गोष्ट तो सहज परत करेल असे फार क्वचितच घडावे मात्र उरण सामाजिक संस्थेच्या तालमीत समाजसेवेचे धडे घेतलेल्या प्रशांत पाटील यांनी आज त्यांना सापडलेला सुमारे 28 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा 128 जी बी चा ए 92 या सिरीजचा मोबाईल संबंधित मुलीला परत केला आहे .

विशेष म्हणजे मोबाईल परत करण्याची कृतज्ञता दाखवल्या बद्दल सदर मुलीने प्रशांत यांना तब्बल 3 हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ केले होते ते पैसे न स्विकारता त्यांनी ते पैसे कुणा गरजवंताला द्यावेत असा सल्ला देऊन तो मोबाईल परत केला !!! प्रशांत पाटील या उमद्या कार्यकर्त्यांचे या कामाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे! उरणच्या कोप्रोली नाक्यावरून ते उरण शहराकडे जात असताना तो मोबाईल त्यांना रस्त्यावर पडलेला आढळला !!! त्यानंतर त्यांना त्या मोबाईलवर फोन आल्यावर त्यांनी संबंधित मुलीला मोबाईल मला सापडला असून तो सुरक्षित आहे.

आपण तो घेऊन जावा असे सांगितले त्यानंतर त्या मुलीने प्रशांत यांना भेटून तो मोबाईल स्वीकारला त्यावेळी ती मुलगी प्रशांत यांना तब्बल 3 हजार रुपये बक्षीस म्हणून देत होती ते न स्विकारता आपण हे पैसे एखाद्या गरीब अथवा गरजवंताला द्यावेत असा सल्ला दिला!! आज दिनांक 28/05/2021 रोजी मी कामानिमित्त उरण येथे जात असताना मला कोप्रोली येथील मुख्य रस्त्यावर A92 128 GB samsung कंपनीचा मोबाईल सापडला त्याची online किंमत ही 28000 आहे.. सदर मोबाईल मी ज्या व्यक्तीचा होता तो त्यांना परत केला आहे.आपण प्रामाणिकपणे मोबाईल दिला म्हणून सदर व्यक्ती ही बक्षीस म्हणून 3000 रुपये देत होती.. आपण ते पैसे न घेता ते 3000 रुपये हे एखाद्या गरजू व्यक्तीला दया असं त्यांना सांगितले आहे..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.