सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
स्वर्गीय वैजयंती विजय म्हात्रे यांचे स्मरणार्थ समर्पित कोविड सेंटर बोकडविरा येथे असणाऱ्या कोविड रूग्णांना व सेवा करणाऱ्या
स्टापला १००० उकडलेली अंडी देण्याचा संकल्प स्नेहबंध समूहाने केला आहे.
या संकल्पाची सुरूवात मंगळवार दि. २५ मे पासून करण्यात आली आहे. दर बुधवार, शुक्रवार, आणि रविवार या दिवशी उकडलेली अंडी समुहातर्फे देण्यात येतील. हा उपक्रम दि. २० जून पर्यत सुरू राहणार आहे.
कोविड सेंटर बोकडविरा येथे सेवा करणारा स्टाप व येथे व्यवस्थापन पाहणारे संतोष पवार यांच्याकडे उकडलेली अंडी देण्यात आली. यावेळी स्नेहबंध समुह उरणचे कार्यरत सदस्य महेंद्र गावंड(पिरकोन), नरेश म्हात्रे (गोवठणे), विश्वनाथ पाटील (पाणजे), मच्छिंद्रनाथ म्हात्रे (वशेणी) आदी उपस्थित होते.
अंडी देण्याच्या उपक्रमात सौ.दिशा तांडेल (सोनारी), भारती बगाटे मॅडम(उरण), विकास पाटील (पाणदिवे), सौ.निलिमा म्हात्रे मॅडम (वशेणी),
प्रतिभा लहासे (उरण), आशा पालकर (वेश्वि), कल्पना गावंड(पिरकोन), केशव गावंड (आवरे), मनोहर वर्तक (गोवठणे) आदी सदस्य सहभागी आहेेेत.








Be First to Comment