सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कोव्हीड काळातील उल्लेखनीय कार्यावर प्रेरीत होवून भाजपचे माजी तालुका वाहतूक सेना अध्यक्ष तथा नवघर ग्रा.पं. चे विद्यमान सदस्य रवि(गणेश) वाजेकर व सदस्या सौ. लिना रतन चोगले तसेच रतन चोगले यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा समवेत माजी आमदार मनोहर भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी १९० उरण विधानसभा हद्दीतील केलेली विकासकामे तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास, बघता इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेकडे वाढत चालला आहे.

याप्रसंगी कार्यकर्त्यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पक्षात स्वागत करुन शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील. तसेच आपल्या विश्वासाला कधीही तडा जावून देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स. सदस्य दिपक ठाकूर, सरपंच आरती चोगले, उपसरपंच हितेश भोईर, मंगेश चोगले उपस्थित होते.








Be First to Comment