सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
एका बंद घराच्या दरवाज्याचे लॉक तोडून त्या वाटे आत प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोखरक्कम असा मिळून जवळपास 1 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उसर्ली गावात घडली आहे.
चंद्रकला भगत यांचे उसर्ली गावातील घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनीबंद घराच्या दरवाज्याचे लॉक तोडून त्या वाटे आत प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोखरक्कम असा मिळून जवळपास 1 लाखांचाऐवज चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment