सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
विना परवाना देशी दारूची वाहतुक करताना प्रविण कृष्णा गायकवाङ (रा.रूम नं.302 गौरीकमल बिल्डिंग चिंचवली शेकीन ता.खालापूर)याला खोपोली पोलीसानी सापळा रचून पकङला असून त्याचेकङून 32हजार 600रूपयेचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
लाॅकङाऊन सुरू झाल्यामुळे जिवनावश्यक वस्तुचा साठा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धावपळ होत आहे. या लाॅकङाऊनचा फायदा घेत तळीरामांची होत असलेली तङफङचा फायदा घेत चढ्या किंमतीने चोराटी दारू विक्री अनेक भागात होत आहे.प्रविण गायकवाङ देखील विना परवाना देशी दारू नेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर याना मिळाली होती.त्यानुसार मंगळवार दिनांक 21जुलै रोजी राञी साङेआठच्या सुमारास पोलीसानी सापळा रचला.त्यावेळी प्रविण गायकवाङ त्याचे ताबेतील रिक्षा क्रमांक एम.एच.46 बी.डी.2818 यामध्ये जि.एम.देशी दारू संत्रा गोल्ड नाव असलेली एकुण 100 बाटलीची विना परवाना दारू वाहतुक करताना मिळुन आला.सदर गुन्ह्यात प्रविण गायकवाङला अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील एकूण 32हजार 600 रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याबाबत
खोपोली पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम 1949, इतर दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई एस घायवट हे करीत आहेत.






Be First to Comment