२२ जुलै रोजी भारतीयांचा तिरंगा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (श्याम लोखंडे )
आज २२ जुलै आजच्या दिवशी भारतीयांचा तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.
२४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. त्या संबंधीचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे.केशरी,पंढरा,हिरवा,आणि निळा,(त्यामुळे भारतीय राष्ट्रीय ध्वज रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून तो चौरंगा आहे) २२जुलै १९४७रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘ तिरंगा ध्वज ‘ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.एकाला एक असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे.वरती गर्द केशरी, मध्यभागी पंधरा,आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, आशा क्रमाने हे तीन रंग आहेत.मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचा अशोकचक्र आहे (धम्मचक्र ) ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे.चक्राला २४आरे आहेत.मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे .भारतीय राष्ट्रध्वजयाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३असे आहे.
राष्ट्रीय ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे,रंग आणि त्याचे अर्थ केशरी. त्याग आणि शौर्य , पांढरा. शांती, निळा. 24 बुद्धांनी दिलेल्या 24 सत्याचं ते प्रतीक आहे. या द्वारे दुःखाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात ,आणि खाली असलेला हिरवा समृद्धीचा आहे.
वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग ,धैर्य याचा बोध होतो .
मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती,सत्य,व पावित्र्याचा बोध होतो.
खालील भागात गडद हिरवा रंग आहे.हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो,निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
निळ्या रंगाचे अशोकचक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो.जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते.मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला अशोकचक्र या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला,तत्वज्ञान,इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘ धम्मचक्र प्रवर्तनाय ‘ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.






Be First to Comment