सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
रायगड जिल्हा कॅरम असोशिएशनच्या मान्यतेने कामोठे कॅरम क्लब आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन कॅरम स्पर्धे मध्ये कर्जतच्या राजेश भुतकर यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत चाळीस नामवंत कॅरमपटूंनी सहभाग घेतला होता.
कोरोना संकटाच्या काळात सर्व काही ठप्प असताना घरी बसुनच खेळाडूंना कॅरमचा सराव करता यावा या अनुशंगाने कामोठे कॅरम क्लबचे अध्यक्ष प्रदिप वाईंगडे, विक्रम वाईंगडे तसेच कॅरम प्रेमी प्रविण म्हात्रे व संतोष पातेरे हे वेळो वेळी ऑनलाइन टूर्नामेंट आयोजित करुन रायगड जिल्ह्यातील खेळाडुंना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. कामोठे कॅरम क्लब वतीने तीन दिवस ऑनलाईन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धे मध्ये कामोठे, पनवेल, कर्जत, महाड, माणगाव, गोरेगांव, अलिबाग, पोयनाड, नेरळ, रसायनी या ठिकाण च्या चाळीस नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत कर्जतचे राजेश सुधाकर भुतकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितिय पारितोषिक कामोठेचे
वैभव शिंदे यांनी, तॄतीय पारितोषिक कामोठेचे नागेश कलगुड्डी व चतुर्थ पारितोषिक कामोठेचे सुरेश बिष्ट यांनी पटकावले. रायगड जिल्हा कॅरम असोशिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे व सचिव दिपक साळवी यांचे या स्पर्धेला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. ‘अशा स्पर्धांमुळे खेळाडूंचे मनोबल वाढते.’ असे विजेता भूतकर यांनी सांगितले.








Be First to Comment