सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे उरण कोविड सेटरमधील पेशंटची वाढती संख्या लक्षात घेत मदतीचा हात पुढे येऊ लागले आहेत. तालुक्यातील भेंडखळ गावातील तरुण उद्योजक नितेश ठाकूर यांनी औषधी गोळ्या भेट दिल्या आहेत.
कोरोना पेशंटवर उपचार होण्यासाठी उरणला कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी उपचारासाठी लागणाऱ्या साहित्यांची कमतरता जाणवत आहे. परंतु ती दूर करण्यासाठी उरणमधील अनेक दानशूर पुढे येत आहेत. या ठिकाणी उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशनची ४० जणांची डॉक्टर टीम विना मोबदला सेवा देत आहेत. तसेच ज्या साहित्यांची गरज भासते ती पूर्ण करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.
तालुक्यातील भेंडखळ गावचे सामाजिक क्षेत्रात मदतीचा हात देणारे तरुण उद्योजक नितेश ठाकूर यांनी पेशंटसाठी आवश्यक असणाऱ्या “फॅबिफ्लू” या गोळ्यांचा साठा भेट दिल्या. यामुळे पेशंटला नक्कीच फायदा होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.








Be First to Comment