Press "Enter" to skip to content

धक्कादायक : पनवेल तालुक्यातुन 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

तालुक्यातील ठाकूरवाडी हरिग्राम येथील 13 वर्षीय मुलगी पाणी आणण्यासाठी बोरवेल वर गेली असता तेथून अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले आहे.

पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिची उंची चार फूट, रंग गव्हाळ, चेहरा गोल, केस काळे, लांब व अंगाने पातळ आहे. तिच्या पूर्ण शरीरावर पांढरे डाग असून तिने अंगात पंजाबी ड्रेस घातला आहे. कपाळावर एक ठिपका गोंदवलेला आहे. कानात व नाकात साधे कानातले आहे. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते.

या मुलीबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.