Press "Enter" to skip to content

उरण मध्ये केंद्र सरकार चा निषेध दिन साजरा

सिटी बेल । उरण । सुनील ठाकूर ।

२६ मे “निषेध दिना “निमित्त आप आपल्या संघटनांचे झेंडे घेऊन,काळा मास्क,काळे कपडे परिधान करून,काळे झेंडे घेऊन उरण तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले.

मोदी हटाव देश बचाव, तीनही काळे कृषी कायदे रद्द करा,आंदोलक शेतकरी संघटनांसोबत पुन्हा चर्चा सुरू करा, कामगार विरोधी ४कोड बील मागे घ्या,वीज विधेयक २०२० मागे घ्या,सर्वांना मोफत लस पुरवठा करा,कोरोना रुग्णांना मोफत औषधोपचार करा, लॉक डाऊन काळात ४महीने रेशनचे धान्य मोफत द्या, बेरोजगारांना ७५००/-रु निर्वाह भत्ता द्या, महागाई कमी करा, पेट्रोल डीझेल,गॅस यांचे दर कमी करा, तौत्के चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, मच्छीमारांना, कोकणातील बागायतदारांना योग्य नुकसान भरपाई द्यावी,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील साहेब यांचे नाव द्या, विमानतळबाधीत प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करा अशा विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

कामगार भवन येथे झालेल्या निषेध निदर्शनात कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील,शशी यादव किसान सभेचे सेक्रेटरी संजय ठाकूर,डी वाय एफ आय चे राकेश म्हात्रे व दिनेश म्हात्रे यांनी संबोधित केले.

जनवादी महीला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील ,सीटूच्या नेत्या दमयंती भगत, युवक आघाडीचे पद्माकर पाटील , संतोष ठाकूर , रविंद्र कासुकर ,सतिश खरात यांनी विविध ठिकाणी उपस्थिती राहून” निषेध दिन”कार्यक्रम यशस्वी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.