ऑक्सिजन पार्कमध्ये टायर गार्डन आणि निसर्ग संवर्धनासाठी झाडांची लागवड
असं म्हणतात की हौसेला मोलं नाही !….हौस-मौज करायचे बहाणेपण खूप असतात….पण आपल्या हौशेतून एखादं समाजकार्य घडतं असेल तर त्याची मजा कुछ औरच असते …असंच निसर्ग संवर्धनात आपलं अनमोल योगदान देणारं दांपत्य …म्हणजे श्री रोहित पाटील आणि … सौ. स्नेहा पाटील …ज्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवसा साजरा करताना सलग दोन वर्ष आपल्या अनोख्या कल्पना कौश्यल्यानं… कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथील हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडावी या करीता …या … निसर्गमित्र दांम्पत्याने आपल्या भन्नाट कलाकारीतुन ….ऑक्सिजन पार्कमध्ये … टायर गार्डन आणि… निसर्ग संवर्धनासाठी झाडांची लागवड ..केली. आणि आत्ता ह्या वर्षी ….आणखी एक भन्नाट कल्पना प्रत्यक्षात साकारली ती ह्या …पर्यावरणप्रेमी दांपत्याने….त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना एक पर्यावरण पूरक कार्य आपल्या हातून साकारवं हि ईच्छा मनाशी बाळगत एक अनोखं कार्य साकारलं ते म्हणजे …ह्या… रणरणत्या उन्हांत पक्षी प्राण्यांनां आपली तहान भागाविण्या करीता आणि त्यातच त्या थंडगार घडाभर पाण्यात मनसोक्त डुंबता यावं म्हणून एक आकर्षक असं जलकुंभ…आणून तो त्या ऑक्सिजन पार्क मध्ये बसविण्यात आला आहे …खरचं निसर्गाप्रति आणि प्राणी पक्षांच्यां प्रति मनात असलेली आस्था हि .या . रोहित …आणि… स्नेहा …या दांपत्याला स्वस्थ बसूच देत नाही…प्रत्येक दिवसातील थोडासा तरी वेळ हीं दोघं निसर्ग संवर्धनासाठी खर्च करत असतात. …त्यांनी निस्वार्थी भावनेतून केलेलं हे कार्य तितकंच प्रेरणादायी !….मग…..जन्मदिवस असोत …वा …लग्नाचे वाढदिवस ….आपण एका वेगळ्या प्रकारे सुद्धा ते साजरे करू शकतो याच एक मूर्तिमंत उदाहरण त्यांनी सर्वांसमोर उभं केलय …आणि… एक आदर्श देखील !…
जलकुंभ स्थापनेच्या पर्यावरण पूरक संकल्पनेतून साकार झालेलं हे सुंदर कार्य


…त्या तहानलेल्या रान -पाखरांना थंडगार तृप्तीचा आनंद तर देईलच पण …त्या अबोल पक्षी-प्राण्याचे आशिर्वाद मात्र नक्कीच ह्या … निसर्गप्रेमी दांम्पत्यास म्हणजेच श्री रोहित पाटील…आणि … सौ. स्नेहा पाटील … यांस लाभतील .. आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आपण एका वेगळ्या प्रकारच्या संकल्पपूर्तीने साजरा करण्याचा आनंद देखील तितकाच सुखावणारां आणि त्या दोघांच्या मनाला एक वेगळाच आनंद देणारा असेल यात तील मात्र शंका नाही !…🙏
✍🏻 अनिल घरत पिरकोन,सारडे,उरण ✍🏻








Be First to Comment