दारु तयार करण्याचे साहित्य ताब्यात, महिलेवर गुन्हा दाखल
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना गोपनीय माहिती मिळाली की , मौजे आपटा गावाच्या हद्दीत घेरावाडी येथील डोंगराळ भागात संगिता अनंत चव्हाण , रा.येगवाडी , पो आपटा , ता.पनवेल ही बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारू गाळुन ती विक्री करण्याचा चोराटी धंदा करते .संगिता अनंत चव्हाण ही गावठी हातभट्टी पहाटेच्या सुमागस लावत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली आणि रसायनी पोलिसांनी धाड करुन दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी उपनिरीक्षक काले व पोलीस उप -निरीक्षक सरगर यांना बोलावून गुप्त बातमीचा आशय कळवून छाप्याकरता पोना. म्हात्रे , पोना.मंगेश लांगी , पोना बैकर , पोना भोईर , पोलिस कांबळे असे सर्वजण खाजगी मोटार सायकलने तपास किटसह पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोव्हिवीशन रेटकरीता मौजे आपटा गावचे हद्दीतील घेरावाडी डोंगराळ भागात छाप्याकरीता रवाना झाले.
आपटा स्टॉपजवळ पोलीस अमलदार असे पंचासह खाजगी वाहनाने घेरावाडी डोंगराळ भागात रवाना झाले. मौजे आपटा गावचे हद्दीतील दाभाळ आदिवासीवाडी येथून घेरावाडी डोंगराळ भागात कच्चा रोडने मुख्य रस्त्यापासून अंदाजे ४ किमी अंतरावर डोंगराळ भागात गेल्यावर घेरावाडी आदिवासीवाडीचे अलीकडे असलेल्या विहीरीजवळ मोटार सायकल उभ्या केल्या . त्यानंतर पंच असे पायी चालत जात असतांना , एका झोपडीच्या पाठीमागील बाजूस लोखंडी ड्रमला खालील बाजूने आग पेटवून त्याचे बाजूस एक महिला उभी असलेली दिसली. तीचा संशय आल्याने सोबत असलेली मपोना / १३३ कांबळे हिने तीस जागीच पकडले . सदर ठिकाणची पंचाचेसह पाहणी केली असता , तेथे खालील बाजूस जमिनीलगत लाकडांची आग लावून त्यावर एक काळपट पञ्याची २०० लिटरची टाकी व त्याचे उजव्या बाजूस एक प्लॅस्टिकची नळी एका सफेद रंगाचे कॅनमध्ये टाकलेली होती . पञ्यांचे टाकीचे वर एक सतेला व त्यामध्ये उग्र वास येत असलेले मिश्रीत द्रव्य होते . सदरचा सतेला बाजुला करून पाहता पञ्यांचे टाकीमध्ये प्लॅस्टिलचे पाईपला एक लाकडी चाटु लावलेला दिसला. पत्र्यांचे टाकचे बाजूस असलेल्या कॅनमध्ये वास घेवून पाहता त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू असल्याचे दिसले .
त्यावेळी त्या महिलेस तीचे नांव गाव विचारता तीने तीचे नांव संगिता अंनत चव्हाण , वय ३५ वर्षे , रा.घेरावाडी , पो . आपटा , ता.पनवेल असे असल्याचे सांगितले . त्यानंतर आजुबाजूचे परिसराची पाहणी केली असता जमिनीमध्ये पुरलेल्या २०० लिटर क्षमतेचे ४ ड्रम मिळून आले . त्या ड्रममध्ये नक्की काय आहे ? याची खात्री केली असता , त्यामध्ये तांबड्या रंगाचा उग्र वास येत असलेले रसायन आंबवून ठेवल्याचे दिसून आले . तसेच झोपटीचे बाजुला असलेल्या मोठया दगडाजवळ दोन २० लिटर क्षमतेचे कॅन भरलेल्या स्थितीत मिळून आले . त्यामध्ये नक्की काय आहे ? याची पाहणी केली असता त्यामध्ये गावठी हातभटटीची तयार दारूचा उग्र वास येत होता . तसेच त्याचे बाजुला ५ कॅन रिकामे पडलेले होते त्यांचे बुच काढून पाहता गावठी दारूचा उग्र वास येत होता . सदर टिकाणी मिळुन आलेल्या प्रोव्हीबिशन मालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे . १ ) २४,८०० / – रूपये किमतीचे एकुण निळया रंगाचे ४ प्लॅस्टिकचे २०० लिटर क्षमतेचे ड्रम प्रत्येक ड्रममध्ये २०० लिटर प्रमाणे दारू तयार करण्याचे तांबडया रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य , १ लिटर प्रमाणे ३० रूपये किंमितीचे ड्रमसह किंमत अंदाजे . २ ) २६०० / – रूपये किंमतीचे २० लिटर क्षमतेचा अॅल्युमिनियमचा सतेला त्यामध्ये २० लिटर दारू तयार करण्याचे तांबड्या रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य १ लिटर प्रमाणे ३० रूपये किंमतीचे सतेल्यासह किंमत अंदाजे . ०० / – रूपये किंमतीचा लाकडी चाटु जूना वापरता किंमत अंदाजे . ४ ) ०० / – रूपये किंमतींची एक प्लॅस्टिकची नळी जूनी वापरता किंमत अंदाजे . ५ ) १०० / – रूपये किंमतीची एक २०० लिटर क्षमतेची पञ्याची टाकी जूनी वापरती किंमत अंदाजे . ६ ) ४०२० / – रूपये किंमतीचा २० लिटर क्षमतेचा सफेद रंगाचा कॅन त्यास फिरकीचे बुच असून तो काढुन पाहता त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू प्रत्येकी २०० रूपये १ लिटर प्रमाणे कॅनसह किं.अं. ७ ) ४०२० / – रूपये किंमतीचा २० लिटर क्षमतेचा सफेद रंगाचा कॅन त्यास फिरकीचे बुच असून तो काढुन पाहता त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू प्रत्येकी २०० रूपये १ लिटर प्रमाणे कॅनसह किं.अं. ८ ) २०१० / – रूपये किंमतीचा १० लिटर क्षमतेचा सफेद रंगाचा कॅन त्यास फिरकीचे बुच असून तो काढुन पाहता त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू प्रत्येकी २०० रूपये १ लिटर प्रमाणे कॅनसह किं.अं. ९ ) १०० / – किंमतीचे २० लिटर क्षमतेचे एकुण ५ रिकामे दारूचा उग्र वास येत असलेले कॅन प्रत्येकी २० / – रूपये प्रमाणे किंमत अंदाजे ३७.२५० / – रूपये . येणेप्रमाणे वरील वर्णनाचा गावठी हातभट्टीचा तयार दारू करण्याकरीता आंबवुन ठेवलेल्या तांबडया रंगाचे उग्र वास येत असलेल्या मिश्रीत द्रव स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये रासायनीक तपासणीकरीता १८० मिली काढुन ते जागीच सिलबंद केले तसचे तयार गावठी हातभट्टीची तयार दारू १८० मिलीच्या स्वच्छ काचेच्या बाटलीत काढून ते जागीच सिलबंद केले .

सिलबंद केलेल्या दोन्ही बाटलीवर तसेच सतेला , प्लॅस्टिकचा पाईप , चाटु , २० लिटर क्षमतेचे तयार गावठी हातभट्टीने दारूने भरलेले दोन कॅन व १० लिटर क्षमतेचा तयार गावठी हातभट्टीची दारूने भरलेला एक कॅनवर पंचाचे व पोलीसांचे सहिचे कागदी लेबल चिटकवून छाप्यात मिळून आलेला प्रोव्हिबीशन माल व साहीत्य ताब्यात घेतले . उर्रवरीत २०० लिटर क्षमतेच्या ड्रम मध्ये तसेच सतेल्यामध्ये मिटून आले रसायन वाहतुकीस अवजड असल्याने ते जागीच जमिनीवर ओतून नष्ट केले आहे . तसेच प्लॅस्टिकचे ड्रम व कॅन हे पेटवून नष्ट केले . सदर ठिकाणचा पंचनामा परि पोसई सरगर यांनी केला. मौजे आपटा गावचे हद्दितील घेरावाडी आदिवासी डोंगराळ भागात संगिता अंनत चव्हाण , वय ३५ वर्षे , रा.घेरावाडी , पो.आपटा , ता.पनवेल हिने गैरकायदा गावठी हातभट्टीची तयार दारू तयार करण्याचे साहित्य व रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारूसह मिळून आली म्हणून तिच्याविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १ ९ ४ ९ चे कलम ६५ खंड क , ई , फ प्रमाणे सरकार तर्फे खबर आहे . सोबत पंचनामा व रसायनीक तपासणी करीता काढुन घेण्यात आलेले १८० मिली रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू , प्रोव्हिबीशन माल व साहित्य आहे.








Be First to Comment