Press "Enter" to skip to content

उरणमध्ये २६ मे रोजी निषेध दिन साजरा होणार

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

२६मे २०२१ रोजी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होणार आहेत,तर मोदींच्या केंद्र सरकारला सात वर्षे झाली आहेत. जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपच्या केंद्र सरकारचा देशभरात “निषेध दिन”आयोजित केला आहे.

देशातील काही प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करा.वीज विधेयक २०२०मागे घ्या. कामगारांनी लढून मिळवीलेल्या हक्कांना तिलांजली देणारे कामगार विरोधी ४ लेबर कोड रद्द करा.आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करा व कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार , रुग्णालयांतील आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करा. सर्व नागरिकांना लस उपलब्ध करा, ग्रामपंचायत निहाय लसीकरणाचे विकेंद्रीकरण करा, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, उपजीविकेचे साधन उपलब्ध करा. सर्व गरजूंना कार्ड असो अथवा नसो एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे मोफत धान्य वाटप करा. सर्व बेरोजगारांना दरमहा ७५००/-रु. निर्वाहभत्ता द्या.सेंट्रल विस्टा प्रकल्प रद्द करा व PM केअर फंडातील रक्कम कोरोना महामारी विरुद्ध वापरा.गगनाला भिडलेले पेट्रोल ,डिझेल व गॅसचे दर कमी करा.जीवनावश्यक चीज वस्तूंचे वाढलेले दर कमी करा, महागाई कमी करा.सार्वजनिक क्षेत्राचे जनविरोधी व देश विरोधी खाजगीकरण कार्यक्रम रद्द करा.अशा विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे.

बुधवार दिनांक २६मे रोजी कोविड महामारीतील निती नियमांचे काटेकोरपणे पालन करुन हे आंदोलन केले जाणार आहे. उरण तालुक्यात सी. आय.टी. यू , जनवादी महिला संघटना,डी. वाय.एफ. आय. व किसान सभा केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळे झेंडे,काळे मास्क,काळे कपडे परिधान करून “निषेध दिन” साजरा करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.