Press "Enter" to skip to content

नागांव ग्रामपंचायत येथे लसीकरण केंद्र सुरू

सरपंच निखिल मयेकर आणि सदस्य यांच्या पाठपुराव्याला यश

माजी सरपंच नंदकुमार मयेकर व रेवदंडा PHC वैद्यकीय अधिकारी डॅा.जुईली वाकडे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन..!

सिटी बेल । अलिबाग । अमूलकुमार जैन ।

नागांव ग्रामस्थांच्या सोयीसाठी नागांव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर व सदस्य हे या कोविड कालावधीत ग्रामस्थांना कोरोना लस घेणे सोयीचे व्हावे याकरिता नागांव येथे लसीकरण केंद्र मिळावे यासाठी प्रयत्नशील होते.

सदर केंद्रावर सध्याच्या शासनाच्या नियमानुसार ४५ वर्षावरील नागरींकांचे लसीकरण सुरू झाले आहे. पुढील लसीकरणाचे वेळापत्रक लसीच्या उपलब्धतेनुसार जाहीर करण्यात येईल असे सरपंच निखिल मयेकर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.