Press "Enter" to skip to content

सारडे विकास मंचचा “एक कुटुंब एक झाड” संकल्प

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

कोरोनाच्या काळात आपल्याकडे निसर्ग नष्ट होऊन उजाड माळरान झाले आहेत. त्यामुळे ‘ऑक्सिजन’ ची नितांत गरज भासली व भासत आहे. यामुळे झाडे लावून त्याची जपवणूक करणे आवश्यक बनले आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सारडे विकास मंचने “एक कुटूंब एक झाड” जगविण्याचा संकल्प केला आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी “एक कुटुंब एक झाड़” उपक्रमा अतंर्गत कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे मधे वृक्षलागवड करीत आहेत.

मागील सलग चार वर्ष या उपक्रमाद्वारे हजारो झाडाच वृक्षारोपण करण्यात आल आहे. यापैकी सुमारे ९० टक्के झाडांच तुमच्या आमच्या सहकार्याने चांगले संगोपन करुण जोपासना करण्यात आली आहे.

त्यामुळे यावर्षी हा उपक्रम आणखी व्यापक करून सर्वांच्या सहभागातून “तुमच झाड़ आमचा खड्डा” अशा प्रकारे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट आपल्या सामोर ठेवले आहे. आपण सर्वांनी फक्त वृक्षारोपणच नव्हे तर त्याचे संवर्धन देखील करण्याचा प्रयत्न करू या. ज्याची कोणाची इच्छा असेल ते वृक्षदान करू शकता. एका वृक्षाची सरासरी किंमत 300/- रुपये आहे. कारण छोटी झाड़ लावल्यावर त्याच्या संगोपनास जास्त कालावधी लागतो म्हणून आपण 2 वर्ष झालेली झाड़ खरेदी करीत आहोत.

आपण खाली दिलेल्या गूगल पे नंबरवर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त आपल्याला हवे तेवढे आपण वृक्षदान करून “एक कुटुंब एक झाड़” या उपक्रमात आपण सहभागी होऊ शकता.अन्यथा आपण एक झाड़ स्वता खरेदी करुण देवू शकता आणि ते झाड़ घेऊन आम्ही सांगितलेल्या दिवशी वृक्षारोपण करू शकता चला आपल्या कुटुंबाच एक झाड़ लावू या,

यासाठी गुगल पे क्रमांक रोहित पाटील कार्याध्यक्ष 9220418174 हा आहे. तर काही गरज लागल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता
नागेंद्र म्हात्रे-अध्यक्ष 9833552403, संपेश पाटील उपाध्यक्ष- 8425046978, रोशन पाटील खजिंदार 9870214652, अनिल घरत – 9819216505, मंगेश पाटील सहसचिव 8108980579 आपल्या कुटुंबाच एक झाड़ आपण लावून निसर्गसवर्धन करू या म्हणूनच विचार बदला देश नक़्क़ी बदलेल. या उपक्रमाला साथ देण्याचे आवाहन सारडे विकास मंचने केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.