Press "Enter" to skip to content

वृध्दाला मारहाण करून सव्वा लाखाची लुट

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

एका वृद्ध इसमास मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे.

नवीन पनवेल सेक्टर 13 येथे राहणारे त्रंबक दहातोंडे (85) यांचे दुमजली घर असून वर त्यांचे कुटुंबिय राहतात. तर त्यांच्या खालील बाजूस असलेल्या एका गाळ्यामध्ये ते स्वतः झोपतात. अज्ञात दोघा चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या गाळ्यात घुसून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.