Press "Enter" to skip to content

कामोठ्यात चोरांचे राज्य : घडाळ्याच्या दुकानासह फुड मॅजिक दुकानात घरफोडी, दुचाकीची चोरी

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

एका बंद घडाळ्याच्या दुकानासह फुड मॅजिक दुकानात अज्ञात चोरट्यांनी केेलेल्या घरफोडीत मोठ्या प्रमाणात विविध कंपनीचे घड्याळे व रोख ररक्म असा ऐवज चोरुन नेल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 21 प्रथम हेरीटेज शॉप नं.17 या ठिकाणी आर्ट वॉच या नावाचे दुकान नौशाद यांचे असून सदर दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने शटरच्या कुलूपाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून शटर उघडून आत प्रवेश केला व शोरुममधील विविध नामांकित कंपन्यांची घड्याळे, रोख रक्कम तसेच शेजारील फुड मॅजिक दुकानातील रोख रक्कम असा मिळून जवळपास 26 हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अ‍ॅक्टीव्हा दुचाकीची चोरी

कामोठेकडे जाणार्‍या रोडच्या बाजूला मार्केट यार्ड जवळ उभी करून ठेवलेली अ‍ॅक्टीव्हा दुचाकी वाहनाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे.

सतेंद्र सोनकर यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीव्हा एमएच-46-एके-9437 पांढर्‍या रंगाची उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.