सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
जेवणाच्या किरकोळ कारणावरुन पतीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून मारहाण करून तीला जीवे ठार मारल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
खारघर वसाहतीमधील सेक्टर 11 येथील पाईपलाईन झोपडपट्टी येथे राहणार्या राजू राठोड (28) याचा वाद त्याची पत्नी भुशी राठोड (23) हिच्या बरोबर जेवणाच्या किरकोळ कारणावरुन झाला. यावेळी त्याने रागाच्या भरात त्याच्या पत्नीचा गळा दाबून मारहाण करून तीला जीवे ठार मारले.
याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगताप, म.पो.सई गायकवाड आदींच्या पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे.








Be First to Comment