सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा कोलाड मार्गावर रिक्षा पलटी झाल्याने यातील प्रवास करणारे एकाच कुटूंबातील दोनजन जागीच ठार झालेची घटना कोलाड नजीक संभे यथे घडली असून सुदैवाने सदरच्या आपघातून दोन चिमुकल्यांचा प्राण वाचला आहे.
सदर या बाबतची सविस्तर माहिती अशी की, रोहा कोलाड मार्गावरून प्रवास करणारी रिक्षा ही संभे नजीकच्या खोल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना २३मे रोजी सायं ५.३० वाजता सुमारास घडली असून यामध्ये एकाच कुटूंबातील पती पत्नी आणि दोन मुले प्रवास करत असतांना ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत पती आणि पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन चिमुकल्यांसह रिक्षा चालक बचावला असल्याची माहिती कोलाड पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.
कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रोहा कोलाड मार्गावर रोहा कडून कोलाड कडे जाणारी रिक्षा सी एन जी एस रिक्षा क्रमांक एम एच ४३ बी आर ४१६७ चालक गणेश दगडू खाडे वय ३८ हे सदरच्या अनंत मारुती कदम यांची पत्नी व दोन मुले असा कुटूंब या रिक्षातून प्रवास करत असताना मार्गावर संभे नजीक अचानकपणे रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने डावेकडील खोल खड्ड्यात ही रिक्षा पलटी झाल्याने अपघातात पती पत्नी यांचे दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली असून अनंत मारुती कदम वय ४७ रा मजगाव तालुका तळा मनीषा अनंत कदम वय ४९ रा मजगाव ता तळा यांना या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तर कु अभिजीत अनंत कदम वय ९ व कु अक्षरा अनंत कदम वय ५ हे दोन चिमुकले व रिक्षा चालक हे या अपघातातून बचावले आहेत.
सदरच्या अपघाताची माहिती मिळताच कोलाड सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमावेत घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी करत कोलाड पोस्टे गुरवं ००४६ /२०२१ भा द वि क्र ३०४ ए २७९,३३७,३३८, मोटर आपघात वाहन अधिनियम १९८८ १८४ प्रमाणे पोलीस दप्तरी नोंद करत पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शखाली पोना पी जी पाटील व पोहवा ए आर म्हात्रे या घटनेचा अधिक तपास करत आहेत








Be First to Comment