सिटी बेल । उरण । प्रशांत म्हात्रे ।
जे जे उत्तम ते आधी करावे असे समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या दासबोधत म्हटले आहे. आज कोरोना ही जागतिक महामारी सर्व जगाला एक भेडसावत असलेली समस्या आहे. आज कोरोना पेसेंटला मानसिक आधारा सोबत आधुनिक साहित्याची सुद्धा आवश्यकता आहे ह्याची सामाजिक जाणिव ठेवून जगात खूप काही करण्यासारखं आहे फक्त करण्याची मानसिकता हवी हेच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून एस एस सी बॅच 1989 समूह तर्फे covid सेंटरला दोन ऑक्सिजन फ्लो मीटर तसेच मोसंबी, सफरचंद ,डाळिंब पदार्थ फळे आणि बिस्किटे इतर असे पदार्थ देण्यात आले.

यात महत्वाचे म्हणजे ऑक्सिजन फ्लो मीटर चा फायदा कॉरोना पेशन्टला केंद्रा पर्यन्त पोहचवताना या ऑक्सिजन मीटरचा खूप खूप फायदा होईल असे संतोष पवार यांनी व्यक्त केली व पवार सर पुढे म्हणाले की एस एस सी 1989 बॅच अशी एकमेव आहे की त्यांनी बहुमोल अशी या वस्तू दिल्या त्यानचं विशेष अभिनंदन मी करत आहे. तसेच या अगोदर सामाजिक तत्वावर अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. सदर प्रसंगी D C H C केंद्राचे संतोष पवार सर डॉक्टर भद्रे ,सर परिचारिका प्राणांजली थळी, नरेश गावंड मदतनीस एस एस बॅचचे प्रतिनिधी सुरेश म्हात्रे , विनायक गावंड सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावंड सर, प्रितम म्हात्रे सर हे मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment