Press "Enter" to skip to content

कोरोनाची लस पडली भारी : लसिकरणासाठी  गेलेल्यांच्या घरी झाली चोरी

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

लसिकरणासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरीच चोरी झाल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे.
         

खारघर वसाहतीत से.-12 येथे राहणारे गणपती वाडीघरे हे आपल्या पत्नीसह से.-15 याठिकाणी कोव्हीड लसीसाठी गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी सेफ्टी डोअरची कडी कापून आत प्रवेश केला व घरातील रोखरक्कम व दागिने असा मिळून जवळपास 70 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.