Press "Enter" to skip to content

ग्रामीण दूर्गम भागात कोरोना पोहोचल्याने चिंता वाढल्यामुळे लॉकडाऊन

लाॅकडाऊन कितीवेळा घ्यावा याबाबत अनिश्चितता-आ.अनिकेत तटकरे यांचे सुतोवाच

शासकीय अधिकारी व महसुली कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)

तालुक्यातील अतिशय दूर्गम डोंगराळ भागात कोरोना रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असून आगामी सणासुदीच्या काळात कोरोनाचे सावट अतिशय गडद झाल्याने लॉकडाऊन अजून कितीवेळा घ्यावा लागेल याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचे सुतोवाच कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेचे सदस्य आ.अनिकेत तटकरे यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ.अनिकेत तटकरे यांच्याहस्ते शासकीय अधिकारी व महसुली कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्याचा छोटेखानी समारंभ पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला असता आ.तटकरे बोलत होते. यावेळी आ.तटकरे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस महिला कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव, पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वाय.सी.जाधव, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष महमद मुजावर, शहरअध्यक्ष अजित खेडेकर व सरचिटणीस सुहास मोरे व अभंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपिठावर तहसिलदार दिप्ती देसाई, पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.भूषण जोशी आणि पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे आदी अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आ.तटकरे यांनी, कोरोनाबाबतच्या सुचना, लक्षणं आणि खबरदारीच्या उपायांबाबत सातत्याने होणारा बदल लक्षात घेता कोविड एन95 मास्क वापरणाऱ्यांनाही कोरोना झाला तसा भविष्यात नियमित सॅनिटायझर वापरणाऱ्यांना कोरोना दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये, असे उपहासपूर्ण भाष्य करीत सर्वांनी खबरदारी घेण्याचे तसेच कोरोना दक्षता ग्रामसमित्या तयार करून क्वारंटाईन व लक्षण दिसणाऱ्यांवर तातडीने उपचार करण्याचे धोरण कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली.

याप्रसंगी आ.तटकरे यांच्याहस्ते, तलाठी डी.एल.जाधव, श्रीनिवास खेडकर, अजय महाडीक, रिना राठोड, एच.पी.जाधव, एस.टी.गोरे, एस.पी.बनसोडे, रितू सुदर्शने-कांबळे, जे.बी.फुलवर, सुनील वैराळे, ए.पी.खेदू,मंडल अधिकारी सिनकर, जाधव तसेच तहसिलदार दिप्ती देसाई, गटविकास अधिकारी डॉ.भूषण जोशी आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वाय.सी.जाधव यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.