उरण मध्ये साकारणार लोकनेते दि.बा. पाटील स्मृतीवन आणि वटवृक्षांचा जंगल !!
सिटी बेल । पाणदिवे । मनोज पाटील ।
शुक्रवार दिनांक २१ में रोजी उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचा वटवृक्षांची नवी मुंबई ह्या संकल्पनेतुन उरण तालुक्यात स्मृती वनांच्या निर्मितीसाठी आणि वटवृक्षांचा जंगल निर्मितीसाठी वन विभागाची आवश्यक जागेसाठी संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी वनविभागाचे आर. एफ. ओ. शंशाक कदम साहेब तसेच उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांची प्रत्यक्ष भेट घेवुन त्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.
वृक्ष लागवडीतुन ते लोकनेते दि. बा. पाटील साहेब स्मृतिवन, हुतात्मा स्मृतिवन, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृतिवन, जेष्ठ निरुपमकार महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी स्मृतिवन, धुतुम गावाचे काविळ वैद्य स्व. हरिश्चंद्र ठाकूर स्मृतिवन, आणि रयत शिक्षण संस्थेचे डॉ. कर्मविर भाऊराव पाटिल स्मृतिवन साकारणार आहेत. तर वटवृक्षांचा जंगल म्हणजेच वट कुळातील वड- उंबर- पिंपळ, नांद्रुक ह्यांसारखे दिर्घायुषी जगणाऱ्या वृक्षांच्या लागवडीसाठी संस्थेला उरण वनविभागाकडील आवश्यक जागेसंदर्भात मागणी पत्राद्वारे केली आहे.
सदर विषयाची एक प्रत उरणचे आमदार महेश बालदी यांनाही देण्यात आली, त्यावेळी आमदारांनी किरण मढवी यांना सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन देवुन संस्थेला नक्कीच सहकार्य करण्यात येईल असे मत जासई येथील भेटी दरम्यान व्यक्त केले. उरण विभागात वरिल प्रमाणे सर्व स्मृतिवने आणि देशातील पहिला वटवृक्षांचा जंगल म्हणुन ऊभे राहिल्यास भविष्यात प्रत्येक उरणकरांना याबाबत नक्कीच अभिमान वाटेल असे मत किरण मढवी यांनी व्यक्त केले.








Be First to Comment