सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना जाहीर करून प्रशासकीय मान्यता व आर्थिक तरतूद शासनाने केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते २३ पत्रकारांना पेन्शन सुरू करून योजनेचा समारंभ देखील करण्यात आला. परंतु यानंतर एक वर्षाहून अधिक कालावधी लोटूनही रायगड जिल्ह्यातील उर्वरित ज्येष्ठ पत्रकार पेन्शन योजनेपासून वंचित राहिले आहेत. अनेक पत्रकार असे आहेत की ते अंथरुणावर खिळले असून उपचारासाठी साध्या गोळ्या आणायलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. या संदर्भात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवीन सोष्टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदन पाठवले असून त्या निवेदनाची एक प्रत माहितीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे. प्रलंबित असलेली ही योजना त्वरित कार्यरत करावी अशी मागणी नवीन सोष्टे यांनी या निवेदनात केली आहे.






Be First to Comment