Press "Enter" to skip to content

खोपटापुल,कोप्रोली ते चिरनेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

३ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।

उरण तालुक्यातील पूर्व भागातील अत्यंत वर्दळीचा आणि अवजड वाहतूकीमुळे दुर्दशा झालेल्या चिरनेर-कोप्रोली-खोपटे या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

एनएचएआयने या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी व मजबुतीकरणासाठी २०२१ यावर्षात ३.७५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवार दि२१ मे २०२१
रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

उरण पुर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या खोपटा पुल ते कोप्रोली या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य वारंवार निर्माण होत आहेत.तरी सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषीं ठेकेदारावर कारवाई करावी आणि सदर रस्त्याचे इस्टिमेट प्रमाणे दर्जेदार नव्याने डांबरीकरण किंवा क्राँकीटी करण करण्यात यावे अशी मागणी मनसेचे नेते सत्यवान भगत, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या कडून मागील पाच वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे.या मागणीची दखल उरणचे आमदार महेश बालदी यांनी घेऊन रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यााासाठी केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मागणी केली.तसेच एन एच ए आय कडून ४५ लाख रुपये सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २०२१ यावर्षात मंजूर करून घेतले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एन एच ए आय कडून वर्ग करण्यात आलेल्या निधीतून व या परिसरातील कंटेनर यार्ड कडून मिळालेला निधी मे.व्ही एस.पाटील या ठेकेदारांच्या माध्यमातून खोपटा पुल ते कोप्रोली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २०२१ या वर्षात खर्च करण्यात आला.तरी ही सदर रस्त्याची दुरवस्था होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली.आणि पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असता उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा खोपटा पुल ते कोप्रोली रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी पाठपुरावा केला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून पावसाळ्या पुर्वी या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामासाठी २०२१ या वर्षांकरिता ३.७५ कोटी रूपयााााचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सदर रस्त्याच्या कडेला गटाराचे ही काम असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होणार आहे. उरण तालुक्यातील प्रसिद्ध ठेकेदार व्ही.एस.पाटील या कंपनीला सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा एकदा मिळाले आहे.जनतेमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवार दि२१ मे २०२१ रोजी करण्यात आला.यावेळी उरण पंचायत समिती उपसभापती शुभांगी पाटील, जि.प. सदस्य बाजीराव परदेशी,

उरण भाजपाचे अध्यक्ष आणि नगरसेवक रवि भोईर, खोपटे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, कोप्रोली सरपंच अलका म्हात्रे, पं.स. माजी सदस्य रमाकांत पाटील, शशिकांत पाटील, राणी म्हात्रे आणि परिसरातील ग्रामस्थ
उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.