Press "Enter" to skip to content

संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची जासई येथे बैठक संपन्न

सिटी बेल । उरण ।

दि बा साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जासई येथे झालेल्या बैठकीतून शासनाला दिला. ‘आता शांततेचा मार्ग नाही’ अशी रोखठोक भूमिका घेण्याबरोबर ‘येईल तो आपल्या सोबत नाही येईल त्याच्याशिवाय हा लढा’ अशी वज्रमूठ करत दिबांच्या नावासाठी काहीही करण्याची तयारी या बैठकीत स्पष्टपणे दिसून आली.

जासई हायस्कुलच्या प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीस लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, कार्यकारिणी सदस्य उद्योजक जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, सरचिटणीस भूषण पाटील, सहचिटणीस सुरेश पाटील, दीपक म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती नरेश घरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, साई संस्थांचे विश्वस्त रवी पाटील, नाथा पाटील, निलेश पाटील, गुलाब वझे,अभिनेते मयुरेश कोटकर, धीरज कालेकर, संतोष केणे, माजी उपमहापौर चारुशिला घरत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, अभिमन्यू पाटील, तेजस कांडपिळे, विकास घरत, विजय चिपळेकर, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, संतोषी तुपे, मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, दिलीप पाटील, संजय ठाकूर, जयेश आर्के (माहीम) यशवंत घरत, माणिक म्हात्रे, संतोष घरत, विनोद म्हात्रे तसेच रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई येथील विविध संघटना, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

छायाचित्र : सुनील ठाकूर

भूमिपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे अशी आग्रही आणि ठाम भूमिका येथील प्रकल्पगस्त शेतकरी, स्थानिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्या अनुषंगाने जासई येथे चौथी बैठक झाली.
पुढील बैठकीत आंदोलनाची रणनिती आणि यामध्ये प्रकल्पग्रस्त ९५ गावांचा समावेश करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे.

२४ जूनला होणारे आंदोलन ‘अभी नही तो कभी नही’ हि भूमिका घेऊन करण्याचे या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले, त्यामुळे लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. त्या अनुषंगाने रणनीतीची बैठक सकाळी ११ वाजता पनवेलमधील महात्मा फुले सभागृह (आगरी समाज हॉल ) येथे होणार आहे.

यावेळी दशरथ पाटील दिबांचे नाव विमानतळाला देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी पत्रव्यवहार करून भेटीची वेळ मागितली होती, मात्र अद्यापही या मंडळींनी त्यावर वेळ दिली नाही, दखलही घेतली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्वोत्तपरी पत्रव्यवहार करूनही वेळ दिली जात नाही हि चांगली बाब नाही. नामदार एकनाथ शिंदेंनी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते.मात्र त्यांनी तसे केले नाही. शिवसेना बाळासाहेबांचे नावावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. असा टोला त्यांनी लगावत असे असले तरी कृती समितीच्या माध्यमातून दिबांसाठी लढा कायम राहील. त्यासाठी काहीही करायची भूमिका समितीमधील मंडळींनी घेतली आहे, असे नमूद केले. ज्यांना अंतकरणाने दिबांचे नाव विमानतळाला द्यावेसे वाटते ते या लढ्यात सोबत राहतील. एकसंघपणाने आपल्याला काम करायचे आहे. आता स्वस्थ बसायचे नाही, असे दशरथ पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोट-
दिबासाहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालाच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे. त्याकरिता आपला लढा कायम राहील. आंदोलन दणदणीत झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर देशातील नागरिकांनी या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. आंदोलनात फूट पाडण्याची विरोधाभास निर्माण करण्याचे प्रयत्न होतील, पण कुणालाही घाबरायची गरज नाही. आपला हक्क मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र करू या.

- माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर

संपर्क करूनसुद्धा नामदार एकनाथ शिंदे टाळाटाळ करीत आहेत. हि भूमिका न्यायाची नाही. दिबांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याची गरज पडली तरी ती वाढवू या. 

- माजी खासदार जगन्नाथ पाटील

प्रकल्पग्रस्ताचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, हि आमची ठाम मागणी आहे. ०३ मे पासून या संदर्भातील बैठका सुरु आहेत. दिबांचे नाव दिले तर आंदोलन स्थगित केले जाईल नाही तर २४ जूनला आंदोलन केले जाईल. दिबांच्या नावाचा आग्रह असल्याचा संदेश या कृती आंदोलनाच्या माध्यमातून राज्य, केंद्र सरकार प्रशासन पर्यंत पाहोचण्यासाठी आंदोलनाची जोरदार तयारी करू या.

- आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष- भाजप, उत्तर रायगड
आपण आतंरराष्ट्रीय पोर्ट, महामार्ग रोखू शकतो त्यामुळे रास्ता रोको करायला काही अवघड नाही. नामदार एकनाथ शिंदे भेटीची वेळ देत नाहीत, त्या अनुषंगाने एकदा रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करू. नामदार एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर भेटायला येतील. दिबांच्या नावासाठी मुळमुळीत नाही तर दणदणीत आंदोलन करू या. 

- आमदार महेश बालदी
दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळालेच पाहिजे हि मागणी रास्त आहे. दिबा सर्वांचे नेते आहेत, सर्व समाजासाठी त्यांनी काम केले आहे, त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी या आंदोलनात उतरले पाहिजे. 

- माजी खासदार डॉ. संजीव नाईक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.