सिटी बेल । उरण ।
कोरोना एक महामारी हा सर्वांसाठी अतिशय वाईट विषय आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्यावतीने रायगड हिंदी अध्यापक विभागाकडून वर्तमान समय मे उपयुक्त शिवनितियाँ या विषयावर व्याख्यानमालेचे गुगल मिटवर ऑनलाइन आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कांबळे सर यांनी भूषविले अध्यक्ष भाषणात सद्यस्थितीत मानवाची विचारसरणी व राहणीमान कसे असावे याबाबत सुंदर माहिती दिली मुंबई विभागाच्या अध्यक्षा डॉ. वंदना पावसकर मॅडम यांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रमात एक ऊर्जा निर्माण केली होती प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. गजानन महाराज वावळ सर( झी टॉकीज प्रसिद्ध राष्ट्रीय शिव किर्तनकार) त्यांच्या बहुमूल्य विचारातून सद्यस्थितीत आत्मविश्वास, संयम, नम्रता हेच कोरोना वर मात करण्यासाठी औषध आहे हे समर्पक उदाहरणांनी सांगितले महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्य सचिव प्रा. रेवणनाथ कर्डिले सर व राज्य कार्याध्यक्ष प्रा .सुंदर लोंढे सर यांचे मार्गदर्शन लाभले मुंबई विभागाच्या सचिव डॉ. पूनम पटवा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात रायगड विभाग अध्यक्ष प्रा.विद्याधर पाटील सर यांनी केली सचिव प्रा. सुवर्णा मोरे मॅडम यांनी सूत्रसंचालन औपचारिक स्वागत प्रा.मोहिनी पाटील मॅडम प्रस्तावना प्रा. रेहाना काजी मॅडम अतिथी परिचय प्रा. सिद्धोधन शेगोकर सर व आभार प्रा. विद्याधर पाटील सर यांनी केले उपाध्यक्षा प्रा. करूना तांडेल मॅडम कार्याध्यक्ष प्रा सुनंदा पाटील मॅडम कोषागार प्रा. कैलास शिकारे सर सल्लागार प्रा बंडू कसबे सर प्रा संतोष मिसाळ सर व नानासाहेब मचे सर यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.








Be First to Comment