सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू )
संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना व्हायरसचे संकटाच्या पार्श्वभूमीवर या संकटाशी आपण सर्व खंबीरपणे लढत आहोत. त्याच अनुषंगाने काॅ. भूषण पाटील यांच्या सहकार्याने कोव्हीड-19 सेंटर उरण(बोकडविरा-केअरपॉइंट हॉस्पिटल) सिडको ट्रेनिंग सेंटर येथे युएलए सिएफएस तर्फे सामाजिक बांधिलकी जपत कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची होत असलेल्या गैरसोयीबाबत त्यांनी केलेल्या मागणीनुसार काल दि. २१ जुलै रोजी हॉट अँड कुल वॉटर डिस्पेन्सरची मशिन भेट दिली आहे.
काॅ. भूषण पाटील यांच्या प्रयत्नामुळे हॉट अँड कुल वॉटर डिस्पेन्सरची मशिनची भेट मिळाल्याने पेशंट वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी तालुका आरोग्य आधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे, डाॅ. स्वाती म्हात्रे व सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी आणि कोव्हीड-19 सेंटर चे कमर्चारी सोशल डीस्टन्स या नियमानुसार उपस्थित होते.






Be First to Comment