सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
तौक्ते चक्रीवादळाचा फटका उरण तालुक्याला बसला. सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उरण शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडून नुकसान झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घटनास्थळी पहाणी करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष ब त्यांचे नेतेमंडळी गेली आहेत. परंतु उरणमध्ये दुर्घटना होऊन २ महिलांचा मृत्यू होऊनही कोणत्याच राजकीय पक्ष किंवा त्यांच्या नेत्यांनी भेट देऊन तसेच इतर कुठेही भेट देऊन पाहणी केली नसल्याने जनतेत नाराजींचा सूर निघत आहे.


उरणमध्ये पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हवेत गारवा निर्माण झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात व तालुक्यातील अनेक गावांत झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तसेच
अनेकांच्या घरावरील छपर उडून मालमत्तेचे नुकसान झाले. त्याचबरोबर राममंदिराची भिंत कोसळून २ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्याने वीज पुरवठा पुर्णपणे खंडित झाला होता. मच्छीमार बांधवांचे नुकसान झाले.


अशा अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ उरणकरांवर आली. वादळ शांत झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी व पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन दिलासा देण्याचे काम करीत आहेत. याउलट उरणमध्ये परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, वीजपुरवठा खंडीत, अनेकांच्या घरावरील छपरही उडून घरातील सामानाची नाधुस झाली, मच्छीमार बांधवांचे नुकसान झाले.तसेच २ महिलांचा मृत्यू होऊनही कोणा राजकीय पक्ष अथवा नेत्यांनी कुठे पहाणी केल्याचे दिसत नाही. इतर ठिकाणी पहाणी दौरे सुरू असताना उरणकरांना कोणी वाली आहे की नाही अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.









Be First to Comment