उरण शहरातील श्री राम मंदीराला लागून असलेली अनधिकृत टपऱ्या उठवा व चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करा : अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन
सिटी बेल । उरण ।
तौकते चक्रीवादळामुळे सोमवार दिनांक १७ मे २०२१ रोजी सकाळी उरण शहरातील गणपती चौकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्री राम मंदिराची ब्लॉक ची भिंत कोसळून मंदिराला लागूनच काही अनधिकृत टपऱ्या थाटल्या आहेत त्याच्यावर हे ब्लॉक पडून चेंडूच्या टप्प्या प्रमाणे उडून समोर बसलेल्या दोन भाजीविक्रेत्या अंगावर फेकले गेले त्यामुळे या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अनधिकृत टपऱ्यामुळे उरण बाजारपेठ मध्ये जाण्यास मोठा अडथळा निर्माण होऊन मोठी गर्दी होते, सदर बाजारपेठेचा ठिकाण हा लोकांनीं गजबजलेला असतो, त्यामुळे भविष्यात आशा घटना पुन्हा होऊ शकतात, त्यामुळे श्री राम मंदिराच्या लागून असलेल्या सर्व अनधिकृत टपऱ्या त्वरीत हाटवाव्या व झालेल्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाही करावी अशी मागणी शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे यांनी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पत्रा द्वारे केली आहे, अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे .










Be First to Comment