राज्यातील आंगणवाडी सेविकांना कोविड 19 च्या सर्वेक्षणाच्या कामातून मुक्ती
सिटी बेल लाइव्ह / उरण ( सुभाष कडू)
राज्यातील अंगणवाडी सेविकांना संपूर्ण लोकसंख्येचे कोविड 19 च्या सर्वेक्षणाचे काम न देता फक्त आंगणवाडी क्षेत्रातील 0ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रीया,स्तनदा माता यांच्याशी संबंधीत सर्वेक्षणातील कामे देण्यात यावी. आशा आशयाचे पत्र दि.19-07-2020 रोजी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नावी मुंबई यांनी इंद्रा मालो भा.प्र.से. यांनी काढले आसून राज्यातील सर्व जिल्हाधीकारी व महानगरपालीका आयुक्त यांना देण्यात आले आहे.
माहे मार्च 2020 पासून कोविड 19चा प्रभाव राज्यात सूरु आहे. तो नियंत्रीत करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजने आंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील ग्रामीण,आदिवाशी व नागरी भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना कोविड19 च्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी अंगणवाडी सेविकांनी उत्तमरित्या पार पाडली आहे. परंतू कोविड 19 च्या सर्वेक्षणाच्या कामकाजामूळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होत असल्याचे शासनास निदर्शनास आले आहे.शासनाच्या आदेशानुसार आंगणवाडी सेवीकांना वय 0 ते 6 वर्ष वयातील बालकांनाची वजन,ऊंची घेऊन ग्रोथ माॅनिटरींग करवी लागत आहे.ग्रोथ माॅनिटरींग केल्या नंतरच राज्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी निच्छीत करणे शक्य होते.व त्यानंतरच कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाला उपाययोजना करता येते.
आज राज्यातील आंगणवाडी सेविका या अत्यंत संवेदनाशील घटक 0ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रीया,स्तनदा माता यांच्यासाठी काम करत आहेत. त्यामूळे आंगणवाडी सेविकांना राज्यातील सर्वेक्षणाची विवीध कामे दिल्याने अंगणवाडी सेविका कोविड पाॅझिटिव्ह होण्याची शक्यता आहे.आणी अस झाल्यास 0ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रीया,स्तनदा माता हे अत्यंत संवेदनाशील घटकांना कोविड 19 ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामूळे यापूढे आंगणवाडी सेविकांना संपूर्ण लोकसंख्येचे कोविड 19 च्या सर्वेक्षणाचे काम न देता फक्त आंगणवाडी क्षेत्रातील 0ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रीया,स्तनदा माता यांच्याशी संबंधीत सर्वेक्षणातील कामे देण्यात यावी.आसे पत्र इंद्रा मालो भा.प्र.से. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नावी मुंबई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधीकारी व महानगरपालीका आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत






Be First to Comment