सिटी बेल लाइव्ह / कोलाज (कल्पेश पवार)
रोहा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने वाढती संख्या ही रोहेकरांच्या चिंतेचा विषय बनून राहिला आहे.रोहे शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण सापडल्याने नागरिकांच्या मनात भीती वाढली असून अनेक लोक चिंताग्रस्त आहेत. आज नव्याने २४ रुग्णांची नोंद झाली असून ही बाब रोहेकरांची चिंता वाढवणारी ठरली आहे.
रोह्यात व ग्रामीण भागात दररोज पाँझीटिव्ह रूग्ण सापडू लागल्याने शहरासह ग्रामीण भागात भितीदायक वातावरण पसरले आहे.ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दक्षता म्हणून काही कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या असून रोहा बाजारपेठही कडक लाँकडाऊन पाळण्यात येत आहे.
तालुका प्रशासन यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार आज कोरोनाचे २४ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.आजमितीला रोहा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे.यापैकी २९३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून,त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ९६ रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु आहेत.तर कोरोना मुळे मयत झालेल्या रूग्णांची आतापर्यंतची ही संख्या ०९ आहे.
अजूनही वेळ गेली नसून कोरोना या महाभयानक आजाराबाबत प्रत्येकाने जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे असून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी सजग राहिले पाहिजे अशाप्रकारचा उपदेश प्रशासनाकडून वेळोवेळी केला जात असल्याने प्रशासनाचा आदेश व सुचनांचे पालन करून व दिलेले नियम पाळून कोरोनाचा आजार आपल्याजवळ येणार नाही यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.






Be First to Comment