Press "Enter" to skip to content

दुकानाचे शटर उचकटून 3 लाख 70 हजार रुपयाच्या मालाची चोरी

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

बंद दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 70 हजार 492 रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी केल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात घडली आहे.

सुलतानराम पेमाराम देवासी यांचे तळोजा औद्योगिक वसाहत बेलनाका येथे स्वस्तिक इलेक्ट्रॉनिक या नावाने दुकान असून, सदर दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मुख्य दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून जवळपास 3 लाख 70 हजार 492 रुपयाच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.