रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कन्या नम्रता केतक घरत हिच्या वाढदिवसा निमित्त उपक्रम
दिव्यांग मित्र अशी ओळख असणारे आमदार मनोहरशेठ भोईर यांची आजही दिव्यांगांसाठीची तत्परता कायम
कोरोना काळात जिवनावश्याक वस्तूंच्या मदतीमुळे शेकडो दिव्यांग बंधू भगिनींना दिलासा
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर – धनश्याम कडू ।
मा.आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना संकटात गरजू दिव्यांगांना आधार मिळावा या हेतूने मनोहरशेठ भोईर यांनी उरणच्या दिव्यांगांना जिवनावश्यक वस्तू वाटपाचा निश्चय केला आणि आज दि.२० मे रोजी मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कन्या नम्रता केतक घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसंपर्क कार्यालयात उरण तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींना तांदुळ,गव्हाचे पिठ, साखर,गोडेतेल,कांदे,बटाटा,मुगडाळ,मसाला,हलद,चहा पावडर,मिठ आदि जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन कोरोना पासुन संरक्षण व्हावे म्हणून सँनिटायझर बाँटल आणि मास्क चे वाटप केले.
कोविड महामारीने रुद्ररुप धारण केले असतांना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाजही वर्तवला जात आहे,आदीच कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून अत्तापर्यंत कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होऊन बसले आहे.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही लोकं छोटे मोठा व्यवसाय करत असत तेही आता बंद झालं आहे.क कोरोनाची माहामारी दिवसेंदिवस वाढत असतांना यावर महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या शर्थीने लढा देत आहे. आरोग्य विषयक सेवांवर मोठ्या प्रमाणात जोर देऊन सुरक्षा कवच म्हणून जनसामान्य पर्यंत पोहचत आहेत. गेल्या वर्ष भरामध्ये विविध माध्यमातून कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सतत सर्वसामान्यांना मदत करणारे, जनतेच्या मनातील उरणचे खरे कोव्हिड योद्धा
आमदार मनोहरशेठ भोईर हे जिल्हा परिषदेत असल्या पासुन ते आजतागायत नेहमी दिव्यांगांच्या पाठीशी राहून सातत्याने दिव्यांगांना आधार देत असतात.
आपल्या आमदारकीच्या कारकीर्दीत आपला आमदार भत्ता सुद्धा दिव्यांगांना वाटप करुन दिव्यांगांना दिलासा देण्याचं काम मनोहरशेठ भोईर यांनी केले असतांना आता कोरोना काळात शेकडो दिव्यांगांना जिवनावश्यक वस्तू वाटप केल्यांने विविध माध्यमातून आमदार मनोहरशेठ भोईर यांचे कौतूक होत आहे.


यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठ पाटील, उपतालुका संघटक के. एम्. घरत, विभाग प्रमुख एस्. के. पुरो,
शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, द्रोणागिरी शहर व्यापारी असो. अध्यक्ष रवींद्र पाटील, उरण उपशहर प्रमुख गणेश पाटील, उपसरपंच मोहनशेठ लबडे, ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष निलेश भोईर, युवा सेनेचे करण पाटील,
उपविभाग प्रमुख विकी म्हात्रे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग प्रतिनिधी राजेश भोईर, रणीता ठाकूर, संदेश राजगुरु, महेंद्र म्हात्रे, उमेश पाटील आदी दिव्यागांनी मेहनत घेतली.
जिल्हा परिषदेत काम करत असल्यापासून ते आज पर्यंत उरणच्या दिव्यांग बंधू भगिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशिल आसणारे आणि आम्हाला नेहमी मदतीचा हात पुढे करुन आमच्या वेदना जाणणारे खरे नेते म्हणून आम्ही मनोहरशेठ भोईर साहेबांकडे पाहतो.आमचे आशिर्वाद नेहमी सोबत राहतील.
महेंद्र म्हात्रे,
दिव्यांग बांधव








Be First to Comment