सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे उरण तालुक्यात व उरण शहरात अनेक नागरिक बाधित झाले असून त्यांच्यावर उरण कोविड सेन्टर व विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकट गंभीर तेथे शिवसेना खंबीर या पक्षाच्या ब्रीदवाक्या प्रमाणे शिवसेना उरणतर्फे निष्ठावंत शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जपत व कोविड महामारीची समस्या लक्षात घेऊन उरण कोविड सेंटरला सर्व वॉर्डसाठी मेडिकल कर्टन स्टँड भेट देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक के. एम. घरत, उपशहरप्रमुख गणेश पाटील, विभागप्रमुख एस के पुरो, चिरनेर ग्रामपंचायत सदस्य श्री धनेश ठाकूर यांनी सदर मेडिकल कर्टन स्टँड उरण चे वैद्यकीय अधिकारी श्री भद्रे व सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment