सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
तौत्के चक्रीवादळामुळे सोमवार दिनांक 17 मे 2021 रोजी सकाळी उरण शहरातील भवरा विभागातील मागीरा-संघर्ष नगर भागातील (मागीरा झोपडपट्टी) घरांची/झोपड्याचे खुप नुसकान झाले आहे. जवळजवळ 20 ते 25 कुटुंब या मध्ये बाधित झाले आहेत व ते उघड्यावर आले आहेत, त्यांना मदतीची खुप गरज होती, या अपाद्ग्रस्थाना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर, शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे, शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, महिला तालुका संघटक(शहर) श्रीमती सुजाता गायकवाड व गटप्रमुख श्री संजय मेस्त्राम यांनी या अपाद्ग्रस्थाना अन्न-धान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे, ओली भाजी, खाऊची पॉकेट, बिस्कीट व लहान मुलांना चॉकलेट आशा विविध वस्तूची मदत करून शिवसेनेचे ८०टक्के समाजकारण जपले आहे व संकट गंभीर तेथे शिवसेना खंबीर हे पक्षाचे ब्रीद वाक्य पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
नगरसेवक श्री अतुल ठाकूर, उपशहर प्रमुख श्री गणेश पाटील, महिला उपशहर प्रमुख रझीया शेख, व उपविभाग प्रमुख श्री विकी म्हात्रे यांनी ह्या जीवनावश्यक वस्तू मागीरा-संघर्ष नगर मध्ये जाऊन अपाद्ग्रस्थाना वाटल्या.








Be First to Comment