Press "Enter" to skip to content

सिटी बेल विशेष : विमानतळाला नाव कुणाचे ? बाळासाहेबांचे कि दि बां चे !

विमान तळाला दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे, दि बा पाटील हे खरे लोक नायक : जयवंत परदेशी उर्फ आमदार

सिटी बेल । पनवेल ।

आमदार म्हणून प्रचलित असणारे जयवंत परदेशी यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी रोखठोक भूमिका मांडली. आमच्या प्रतिनिधी शी बोलताना त्यांनी सांगितले की नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा जेव्हा जेव्हा विषय येईल तेव्हा तेव्हा माझे प्राधान्य हे शेतकऱ्यांचे नेते प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनायक दि बा पाटील साहेब यांच्याच नावाला राहील.

परदेशी पुढे म्हणाले की संभा चव्हाण,कोकण पुत्र बॅरिस्टर अंतुले यांच्यासारख्या दिग्गजांना दि बा पाटील साहेब यांनी पराभूत केले होते. शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना स्वाभिमानाने जगण्यास त्यांनी शिकविले. गरीब शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने करून यांचे न्याय हक्क मिळवून देणारे दि बा पाटील साहेब हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे नेते होते. इथल्या आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरलाच पाहिजे.जसे मुंबई चे सुपुत्र नामशेष झाले तसे जर आपल्याला नामशेष व्हायचे नसेल तर आज नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेब यांचे नाव देण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. त्यांचे नाव विमानतळाला देणे हीच त्यांच्यासाठी योग्य आदरांजली आणि श्रद्धांजली असेल.

परदेशी पुढे म्हणाले की, आज आपण ऐश्वर्या संपन्न जीवन जगत आहोत त्याचे श्रेय पाटील साहेबांना जाते. त्यांच्या धोरणी विचारांतून जर का साडेबारा टक्के परतावा याची योजना अमलात आली नसती तर आपल्याला हलाखीत जीवन जगावे लागले असते. इथल्या शेतकऱ्यांना करोडपती बनविण्याचे श्रेय हे दि बा पाटील साहेब यांचेच आहे.आज आपली मुले नातवंडे सुखाचे दिवस पहात आहेत ते त्यांच्यामुळेच. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव हे लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे दिले पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.