
पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मोफत सिमेंटच्या पत्र्याचे वाटप, मोफत छत्री वाटप व गोरगरिबांना अन्नधान्याचे किट वाटप
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू )
उरण तालुका काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध साहित्यांचे आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मोफत सिमेंटच्या पत्र्याचे वाटप, मोफत छत्री वाटप व कोरोना महामारीत सापडलेल्या गोरगरिबांना अन्नधान्याचे किट वाटप आज उरण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी उरण विधानसभा अध्यक्षा भावना घाणेकर, तालुका अध्यक्ष मनोज भगत, युवक तालुका अध्यक्ष समाधान म्हात्रे, शहर अध्यक्ष गणेश नलावडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment