सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
सध्या जगावर खुप मोठे कोरोना नावाचे संकट आले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. आपले जवळचे नातेवाईक, मित्र, ही आपल्या डोळ्यासमोर गेले पण आपण काहीही करू शकत नाही. अशावेळी ह्या रुग्णांना मानसिक धीर देणे गरजेचे असते.यासाठी अनेक सामाजिक संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत मदत करताना आपल्याला दिसून येतात. याच अनुषंगाने पंचरत्न अध्यापक विद्यालत पिरकोनचे सण 1994 ते 96 च्या डि एड बॅचचे विद्यार्थी मित्र व सद्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक मित्रांनी एकत्र येऊन समर्पित कोविड सेंटर उरण येथे कोरोना रुग्णासाठी आवश्यक असणारे साहित्य भेट दिले.
त्यामध्ये मिक्स ड्रायफ्रूड ची 400 पॉकेट्स,ORSL ची 150 पॉकेट्स, पिण्याच्या पाण्याच्या 500 बॉटल दिल्या.
यावेळी डॉ भद्रे, डॉ.भवसार, सामाजिक कार्यकते संतोष पवार,यांच्याकडे शिक्षक मित्र कौशिक ठाकूर सर,विकास पाटील सर,प्रशांत कोळी सर,उपेंद्र ठाकूर सर यांनी सुपूर्त केले.
यासाठी पंचरत्न अध्यापक विद्यालय पिरकोन च्या 1994-96 बॅच चे महेंद्र गावंड , धिरेंद्र ठाकूर ,विकास पाटील , वनिता पाटील , प्रतिभा कुडेकर -पनवेल, बापू जायभाय सर- अहमदनगर, सुनिता पाटील-पेण, संगीता पाटील , विनोद पाटील , देविदास पाटील ,उपेंद्र ठाकूर , गणेश म्हात्रे , अविनाश नवाले , सतीश गावंड , नवनीत माळी , जयश्री गावंड , छाया गावंड , सुरेखा मुंबईकर , कौशिक ठाकूर, प्रशांत कोळी, पुष्पा मोकल, प्रमिला म्हात्रे, करुणा मोकल वर्गमित्र एकत्र येऊन केलेल्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment