शेकापचे शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
उरण तालुक्यातील वाढता कोरोना प्रधुर्भाव व मृत रुगणाची संख्या पाहता प्रत्येक गावात शहरातील प्रत्येक वार्डात लसीकरण केंद्र उभारावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस पत्रकार शेखर पाटील यांनी उरण चे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन केली.
उरण मध्ये लसीकरण वेग वाढविणे गरजेचे आहे यासाठी उरण मधील गृहनिर्माण संस्था तसेच खाजगी रुग्णालयात याना लसीकरण करण्याची परगानवंगी धावी आजच्या काळात लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय आहे वेगाने लसीकरण होणे यासाठी उरण तालुक्यातील प्रत्येक गाव व शहरातील प्रत्येक वार्डातील शाळेत लसीकरण राबविण्यात यावे अशी मागणी भेटीदरम्यान तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांजकडे करण्यात आली. यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले तहसीलदार साहेब यांनी लसीचा पुरवठा उपलब्ध झाल्यास प्रत्येक गावात व शहरातील वार्डातील शाळेत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येईल असे सांगितले.
यावेळी शहर पदाधिकारी दिलीप पाटील उपस्थित होते उरण शहरातील पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने धुळीवाडा येथे पाणी साचून घरात जाते भरती वओहोटी मुळे पाणी तुंबून राहते यामुळे वीत्त हानी व जीवित हानी होण्याचा धोका आहे तरी या ठिकाणी उघड बांधावी अशी मागणी करून लेखी निवेदन देण्यात आले.







Be First to Comment