सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर।
कोविड च्या महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत कोरोना पेशंट ना बेड मिळणे कठीण झाले आहे कोरोना रुगणाची मरणानंतर ही स्मशानभूमीअपुरी पडत आहे तरी राज्यातील प्रत्येक तालुक्यात विदुयुत स्मशानभूमी उभारावी अशी मागणी उरण उत्कर्ष समिती चे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांजकडे केली आहे.
कोविड 19 च्या महामारीत गेल्या वर्षांपासून जो प्रकोप चालू आहे त्याची पहिली व दुसरी लाट सुरू आहे भविष्यात आशा लाटी येतच राहतील असे तज्ञ यांचे मत आहे परन्तु हे प्रमाण असेच वाढत गेले तर स्मशानभूमी दफन भूमी अपुऱ्या पडतील तसेच मृतदेह यांची विल्हेवाट लावणे साठी मनुष्यबळ कमी पडेल या सर्व गोष्टींचा विचार करता प्रत्येक तालुक्यात मनुष्यबळ सह सर्व सुविधा युक्त सुसज्ज विदुयुत स्मशानभूमी हा एक योग्य पर्याय होऊ शकतो तरी विदुयुत स्मशानभूमी युद्ध पातळीवर उभारणी साठी निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी उरण उत्कर्ष समिती चे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी केली आहे.








Be First to Comment