सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।
तालुक्यातील सावरोली गावातील पुंडलिक गणेश पाटील आणि श्रीपाद सदानंद पाटील या दोघाना विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करताना पोलीसानी रंगेहाथ पकडले .
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन इसम सावरोली ओम ढाब्याजवळ विना परवाना गैरकायदा देशी व विदेशी दारुच्या बाटल्याची विक्री करत असल्याचे समजले.पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या सूचनेनुसार पथकाने छापा टाकला असता पुंडलिक आणि श्रीपाद जवळ 17हजार 900 रुपये किमतीची माल सापडला.याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम,1949 चे कलम 65 (ड),(ई),(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक स्वप्नील सावंत देसाई करीत आहेत.







Be First to Comment