सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
कृषी विभागा मार्फत खरीप हंगामा मध्ये सुरवातीस बीज प्रक्रिया मोहीम उरण तालुक्यातील चाणजे सजा मार्फत राबविण्यात येत आहे.बीज प्रक्रिया व भात उगवण क्षमता चाचणी तसेच दहा टक्के रासायनिक खत बचत याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले .त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक ढवळ व्ही.एस. व कृषी सहाय्यक एस.एस.ढ़ाकणे यानी शेतकर्याना प्रात्यक्षिक करुन दाखवुन मार्गदर्शन केले.

बीज प्रक्रिया केल्या मुळे जमिनितून बियाणे द्वारे पसरणा रे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करुन पिकांची वाढ होण्या साठी बीज प्रक्रिया कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे.तसेच बियाणे उगवण क्षमता चाचणी ही शेतकर्यानी पेरणी आधी करावी असे आवाहन केले.तसेच कृषी विषयक इतर योजना .महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा.नारळ.(फळ बाग).लागवड़ी चा चाणजे सजे तील शेतकर्यानी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक एस.एस.ढ़ाकणे यानी केले आहे.








Be First to Comment