सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरातून बाहेरून कडी लावून तसेच स्वतःचे सर्व सामान घेवून एक तरुणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 या ठिकाणी राहणारी 19 वर्षीय तरुणी रंग गोरा, नाक बसके, चेहरा उभट, बांधा सडपातळ, उंची 5 फूट 2 इंच असून अंगात ग्रे रंगाचा टॉप व शॉर्ट लेगिज सोबत एक सोन्याचे मंगळसूत्र व एक चेन व मोबाईल घेवून गेली आहे. तीला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा अवगत आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खारघर पोलीस ठाणे पो.हवा.सचिन गोसावी यांच्याशी संपर्क साधावा.







Be First to Comment