माजी आमदार मनोहेरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
केगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा येथील सर्वात मोठया नाल्याचे खोदकाम तसेच रुंदीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहेरशेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले.
केगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा येथील या सर्वात मोठया नाल्यातून सर्व परिसराचा सांडपाणी व पावसाचा पाणी जात असे परंतु बरेच वर्ष या नाल्याकडे दुर्लक्ष झाल्याने तो पूर्णपनणे नादुरुस्त झाल्याने समुद्राचे पाणी शेतात जाऊन शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत होते.
या नाल्याच्या कामाबद्दल केगाव-दांडा ग्रामस्थांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांना विनंती केली असता त्यांनी लगेच सिडकोच्या माध्यमातून हे काम मंजूर केले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी माजी आमदार श् मनोहरशेठ भोईर यांचे आभार मानले आहेत.

या कार्यक्रमास उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, केगाव ग्रामपंचयत सरपंच नंदकुमार पाटील, राजेंद्र ठाकूर, सदानंद पाटील, जीवन पाटील, जगजीवन नाईक, अमोल तांबोळी, आशिष तांबोळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या,दांडा शाखाप्रमुख महेश पाटील, गणेश पाटील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व दांडा ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment