चक्रीवादळाग्रस्थांचे चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करून भरपाई संदर्भातील सर्व माहिती ग्रामपंचायत कार्यालयांबाहेर लावा
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रिवादळाने रायगड जिल्ह्यात कोट्यावधींची वित्तहानी याबरोबरच मनुष्यहानी देखील झाली. अनेकांची घरे, वाडे, झाडे, याबरोबरच विधुत पोल जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र काहिंना नुकसान भरपाई मिळाली तर काहींना अजून मिळालीच नाही. तसेच पंचनाम्यातील रक्कम व मिळालेली रक्कम यात खुप मोठी तफावत असून यामध्ये अफरातफर झाल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चक्रीवादळाग्रस्थांचे चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करून नुकसान भरपाई संदर्भातील सर्व माहती ग्रामपंचायत कार्यालयांबाहेर लावा अशी मागणी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी सुधागड तहसीलदारांना दिले आहे.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनिल साठे, पाली शहर अध्यक्ष अंकुश चोरघे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मिलींद शेळके आदी उपस्थित होते.






Be First to Comment