सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू )
कोरोना कोविड १९ विषाणूने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. अशा वातावरणात संकटसमयी सारडे गावच्या रोशन पाटील या तरुणाने आपला वाढदिवस आपले गाव मोफतपणे सॅनिटाईज करून देण्याचा निर्धार करीत कामाला सुरुवात ही केली आहे. यामुळे नक्कीच कोरोनावर काही अंशी तरी आळा बसणार आहे. रोशन पाटील यांच्या उपक्रमाचे तालुक्यातील गावोगावी अनुकरण झाले तर नक्कीच तालुका कोरणामुक्त होण्यास वेळ लागणार नाही अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे.
सारडे गावातील सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या रोशन पाटील या उमद्या तरुणाचा वाढदिवस येत्या २४ जुलै रोजी आहे. मात्र त्यांनी आपला वाढदिवस कोणताही थाटमाट न करता दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित साजरा करीत असतात. यावेळी कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी व आपल्या गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी गाव सॅनिटाईज करण्याचा निर्धार केला आहे.
कोरोना विषाणूचा उरण तालुक्यात ही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसत आहे. दररोज १५ ते २० पॉजेटीव्ह पेशंट सापडत आहे. तसेच गावोगावी कोरोना पॉजेटीव्ह सापडू लागले आहेत. त्यापासून आपल्या गावाची सुरक्षितता करण्यासाठी रोशन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत तो धुमधडाक्यात साजरा न करता आपले सारडे गाव सॅनिटाईज करण्याचा निर्धार केला आहे. त्याप्रमाणे सॅनिटाईझ करण्यास सुरुवात ही केली आहे. याकामी त्यांना सारडे विकास मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मदत करीत आहेत
रोशन पाटील यांनी हा उपक्रम मोफतपणे सुरू केला आहे. सारडे गावातील कोणाला आपले घर
सॅनिटाईज करून हवे असेल त्यांनी एक कॉल अथवा प्रत्यक्ष येऊन सांगितले तरी त्यांचे प्रतिनिधी आपल संपूर्ण घर सॅनिटाईज करून देतील. सॅनिटाईज करण्यासाठी ९८७०२१४६५२, ८४२५०४६९७९, ९२२०४१८१७४, ८१०८४८९१८२ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या महामारीत आपल्या गावाचे रक्षण करण्यासाठी रोशन पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोनावर मात करण्यासाठी केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे नक्कीच गावात कोरोनाचा होणाऱ्या प्रादुर्भावाला काही प्रमाणात तरी आळा बसेल. त्याचे अनुकरण इतरांनी करण्यास हरकत नाही.






Be First to Comment